कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्ये प्रकरणी सुरू असलेला तपास संथ असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी सीआयडी आणि सीबीआय या दोन्ही तपाससंस्थांवर ताशेरे ओढले.
मुंबई- कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्ये प्रकरणी सुरू असलेला तपास संथ असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी सीआयडी आणि सीबीआय या दोन्ही तपाससंस्थांवर ताशेरे ओढले.
पानसरे हत्या प्रकरणाचा तपास सरकारने सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे का? अशी विचारणाही न्यायालयाने सरकारला केली.
पानसरे यांच्या कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी सरकारने सीबीआयकडे तपास सोपवण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि शालिनी फणसाळकर जोशी यांना दिली होती. मात्र सरकारी वकील संदीप शिंदे यांनी आपल्याकडे तशा काहीही सूचना आल्या नाहीत, असे सांगितले.