‘डेरा’ प्रमुखाच्या अटकेनंतर हरियाणात उसळलेल्या हिंसाचारामुळे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर चांगलेच गोत्यात आले आहेत.
पंचकुला- ‘डेरा’ प्रमुखाच्या अटकेनंतर हरियाणात उसळलेल्या हिंसाचारामुळे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर चांगलेच गोत्यात आले आहेत. खट्टर यांना पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयानेही कठोर शब्दांत फटकारले आहे. ‘राजकीय फायद्यासाठी हरियाणा सरकारने पंचकुला व सिरसा येथे हिंसाचार, आगडोंब उसळू दिला, अशा शब्दात न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
बलात्काराप्रकरणी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित राम रहीम सिंग यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर हरियाणात उफाळलेला हिंसाचार शनिवारी सकाळी नियंत्रणात आला. शनिवारी सकाळपासून हरियाणा, पंजाबमध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी ‘डेरा सच्चा सौदा’च्या सुमारे ५०० समर्थकांना ताब्यात घेतले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘डेरा’च्या ३६ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. दरम्यान, हरियाणातील परिस्थितीनंतर खट्टर यांची खुर्ची धोक्यात आल्याचे बोलले जात होते, मात्र त्यांना हायकमांडकडून क्लीन चिट देण्यात आली.
दोन महिला अनुयायींवर बलात्कार केल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी गुरमित राम रहीम यांना दोषी ठरवले. या प्रकरणात सोमवारी गुरमित राम रहिम यांना शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. त्यांना सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘डेरा सच्चा सौदा’चे हजारो समर्थक रस्त्यावर उतरले. शुक्रवारी दुपारपासून हरियाणा आणि पंजाबमध्ये हिंसाचार उफाळला होता. वृत्तवाहिन्यांच्या दोन ओबी व्हॅनसह इतर वाहने, इमारती आणि रेल्वे स्थानकांना डेरा सच्चा सौदाच्या समर्थकांनी लक्ष्य केले होते. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला.
न्यायाधीश कारागृहात जाऊन शिक्षा सुनावणार
दोषी ठरलेले बाबा राम रहीम सिंग यांना सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. मात्र यावेळी बाबा राम रहीम सिंग कोर्टात जाणार नसून न्यायाधीश स्वत: रोहतक कारागृहात जाऊन शिक्षा सुनावणार आहेत.
[EPSB]
बाबाचा बलात्कार कोड होता ‘पिताजी की माफी’
बलात्कार प्रकरणी दोषी ठरलेला ‘डेरा सच्चा सौदा’चा गुरमित राम रहीम सिंग याला तुरुंगात व्हीआयपी सुविधा दिल्याचे वृत्त आहे.[/EPSB]
पंचकुला न्यायालयाने ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा रामरहीम सिंग याला बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवून त्याला अटक करण्यात आली. या निकालानंतर हरयाणात मोठा हिंसाचार होऊन त्यात ३२ जण ठार झाले. त्यासाठी न्यायालयाने खट्टर सरकारला थेट जबाबदार धरले आहे. ‘राम रहीमला न्यायालयात आणताना किती गाड्या त्याच्या ताफ्यात असतील हे आधीच ठरले होते. मग शंभरहून अधिक वाहने त्याच्यासोबत कशी आली? गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाली असतानाही गर्दीवर नियंत्रण मिळविण्याची पुरेशी खबरदारी सरकारने का घेतली नाही? कलम १४४ लागू असतानाही पंचकुलात इतक्या मोठ्या संख्येने लोक कसे जमले?,’ अशा प्रश्नांची सरबत्तीच न्यायालयाने केली.
‘डेरा’च्या मालमत्ता सील करा!
‘राम रहीमच्या अटकेनंतर हिंसाचार घडवणा-यांचा शोध घ्या आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा. तसेच, हिंसाचारात झालेली नुकसानभरपाई वसूल करण्यासाठी डेराच्या मालमत्तेचा तपशील जमा करा. त्यांच्या मालमत्ता जप्त करा,’ असे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत. पंजाब व हरयाणाच्या विभागीय उपायुक्तांना नुकसानीची माहिती घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
बाबा रामरहीमच्या डे-यात लष्कर घुसले!
‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा रामरहीम सिंगला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक झाल्यानंतर पंजाब-हरयाणात उसळलेला हिंसाचार अजूनही सुरूच आहे. ‘डेरा’चा गड असलेल्या सिरसा येथील डे-यात राम रहीमचे हजारो अनुयायी जमले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराने डे-यात प्रवेश केला असून संपूर्ण आश्रमाला घेराव घातला आहे. रामरहीमला अटक झाल्यानंतर हे अनुयायी संतापले असून त्यांच्याकडून हिंसाचार होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर बळाचा वापर न करता त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न लष्कराने सुरू केले आहेत. मात्र, हे लोक बाहेर पडण्यास तयार नसल्याने तणाव वाढला आहे. दुसरीकडे, पंजाबमध्येही सुरक्षेची आघाडी लष्कराने सांभाळली असून मनसा येथे ध्वजसंचलन केले.
पंचकुलामध्ये समर्थकांचा धुडगूस
गुरमीत सिंगला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर गुरमीत सिंगच्या समर्थकांनी पंचकुलामध्ये धुडगूस घातला. त्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या ओबी व्हॅन्ससह इतर वाहनांची जाळपोळ केली.
गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
पंचकुलामधील हिंसाचारानंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अधिकृत निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि गुप्तचर यंत्रणांचे अधिकारीदेखील या बैठकीस उपस्थित आहेत.
Haryana: #Visuals of #RamRahimSingh‘s Dera Sacha Sauda ashram in Hisar pic.twitter.com/osOqoM6tEC
— ANI (@ANI) August 26, 2017
#RamRahimVerdict Punjab Police and Army conducted flag march in Punjab’s Moga pic.twitter.com/i0DGbLQU0r
— ANI (@ANI) August 26, 2017
You let Panchkula burn for political benefits: Punjab, Haryana HC slams state govt.
Read @ANI story | https://t.co/vsGP1RuPWQ pic.twitter.com/7nUYZton0t
— ANI Digital (@ani_digital) August 26, 2017
संबंधित बातम्या….
‘बाबा रहीमला तुरुंगात व्हीआयपी सुविधा नाही’