उल्हासनगरजवळील हाजी मलंग या तीर्थक्षेत्राच्या गडावर आता फ्युनिक्यूलर रेल्वेने जाता येणार आहे.
उल्हासनगर- उल्हासनगरजवळील हाजी मलंग या तीर्थक्षेत्राच्या गडावर आता फ्युनिक्यूलर रेल्वेने जाता येणार आहे. येत्या नवीन वर्षापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग उल्हासनगरचे अधिकारी श्रीकांत ढिलपे यांनी दिली आहे. हाजी मलंग हे हिंदू व मुस्लिमधर्मियांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, येथे हाजी अब्दुल रहमान शहा यांची पवित्र दर्गा असून हिंदुधर्मीय येथे मच्छिंद्रनाथ यांचे मंदिर असल्याचे मानतात. या ठिकाणी वर्षभरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. पायथ्यापासून गडापर्यंत पायी जाण्यासाठी साधारण पाच तासांचा कालावधी लागतो. काही ठिकाणी धोकादायक द-या असल्यामुळे अनेकांचा पायी चालताना तोल जाऊन मृत्यूही झालेला आहे.
२०१० मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात फ्युनिक्यूलर रेल्वे प्रकल्पाचा पाया रचला गेला. तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने जागेची पाहणी करून तत्काळ कामास सुरुवात केली. मात्र, नेरळ-माथेरान झोन पर्यटन विभागात हे क्षेत्र येत असल्यामुळे वनखाते व अन्य संबंधित विभागाच्या परवानगी मिळविण्यात दीड वर्षे विलंब लागला. सुप्रीम-सुयोग फ्युनिक्यूलर रोपवे या कंपनीला हाजी मलंग फ्युनिक्यूलर रेल्वेचे कंत्राट मिळाले असून यासाठी तब्बल ५४ करोड रुपये खर्च लागला आहे. ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, त्यात अनेक अडचणी आल्यामुळे हा प्रकल्प रखडला.
मध्यंतरी काही भंगारचोरांनी लाखो रुपये किमतीचे सामान साईटवरून चोरी केल्याच्या घटना देखील घडली. अखेर अनंत अडचणींवर मात करून हा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. येत्या नववर्षांत प्रत्यक्ष फ्युनिक्यूलर रेल्वेमार्फत अवघ्या २० मिनिटांत गडावर जाता येईल. एका फेरीत १२० प्रवासी व सामान वाहतूक करण्याची क्षमता या रेल्वेत असेल. तसेच दोन रेल्वे गाडय़ा ये-जा करण्यासाठी असेल, अशी माहिती सार्व. बांधकाम विभाग अधिकारी ढिलपे यांनी दिली.
[EPSB]
रजनीशकुमार एसबीआयचे अध्यक्ष
नवी दिल्ली – केंद्र सरकारने बुधवारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी रजनीशकुमार यांच्या नावाला मंजुरी दिली.
[/EPSB]