प्रो-कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामातील गटवार साखळीमध्ये (झोन ए) मंगळवारी गुजरात जायंट्सने दबंग दिल्लीचा ४२-२२ असा मोठय़ा फरकाने पराभव केला.
चेन्नई- प्रो-कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामातील गटवार साखळीमध्ये (झोन ए) मंगळवारी गुजरात जायंट्सने दबंग दिल्लीचा ४२-२२ असा मोठय़ा फरकाने पराभव केला. या विजयासह गुजरातने ‘झोन’मधील अव्वल स्थान कायम राखले.
सचिनसह (११ गुण) चंद्रन रणजीतच्या (९ गुण) प्रभावी चढाया हे गुजरातच्या आणखी एका विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. या दुकलीला सुनील कुमारची (६ गुण) सुरेख साथ लाभली. दिल्लीचा खराब खेळाचा सिलसिला कायम राहिला. त्यांच्यातर्फे अबॉल्फाझल मॅगसोडिओ (७ गुण) आणि आर. श्रीरामने (६ गुण) थोडा प्रतिकार केला.
अचूक चढाया करताना गुजरातने दिल्लीवर तब्बल सहा ‘लोण’ चढवले. गुजरातचा बचावही उत्तम राहिला. दिल्लीला एकही ‘लोण’ चढवण्याची संधी त्यांनी दिली नाही. गुजरातचा १८ सामन्यांतील हा ११वा विजय आहे. दंबग दिल्लीचा पाय खोलातच असून १९ सामन्यांत त्यांना १४वा पराभव पाहावा लागला.
[EPSB]
भारताचा महिला संघ चौथ्या स्थानी कायम
विश्वचषक उपविजेत्या भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी क्रमवारीत (रँकिंग) चौथे स्थान राखले आहे.
[/EPSB]