भाजपाचे दिवंगत नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची जन्म तारीख १२ डिसेंबर नसून केवळ शरद पवार यांच्याशी साधम्र्य साधण्यासाठी ती बदलून घेतली असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
मुंबई- भाजपाचे दिवंगत नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची जन्म तारीख १२ डिसेंबर नसून केवळ शरद पवार यांच्याशी साधम्र्य साधण्यासाठी ती बदलून घेतली असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
गोपीनाथ मुंडे यांची जन्म तारीख त्यांच्या आई-वडिलांच्याही लक्षात नव्हती, असे आपल्याला धनंजय मुंडे यांनीच सांगितले असल्याचेही अजित पवार म्हणाले. एका वृत्तवाहिनीवर बोलताना अजित पवार यांनी हा खुलासा केला.
गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, माधुरी मिसाळ काँग्रेसमध्ये जाणार हे निश्चित झाले होते. मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी त्यांना प्रवेश दिला नाही. मात्र भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी त्यांची समजूत काढल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.