सध्या डेस्टिनेशन वेडिंग तसेच थीमवेडिंगचा ट्रेण्ड आहे. पण आंध्र प्रदेशात काही दिवसांपूर्वी असे लग्न पार पडले, ज्यात वऱ्हाडी आणि नवरा-नवरीच्या जागी ‘देव’दिसत होते.
हैदराबाद- सध्या डेस्टिनेशन वेडिंग तसेच थीमवेडिंगचा ट्रेण्ड आहे. पण आंध्र प्रदेशात काही दिवसांपूर्वी असे लग्न पार पडले, ज्यात वऱ्हाडी आणि नवरा-नवरीच्या जागी ‘देव’दिसत होते. खरंतर या लग्नाची थीम गॉड अर्थात ‘देव’ ठेवण्यात आली होती. त्यामुळे नवरा-नवरीसह सर्व वऱ्हाडी मंडळी ब्रह्म, विष्णू, शंकर, लक्ष्मी, पार्वती, सरस्वती आणि इतर देवी-देवतांच्या वेशभूषेत आले होते.
या लग्नाचे आयोजन नवरीचे वडील श्रीधर स्वामी यांनी केले होते. आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातील तनुकू या ठिकाणी हे लग्न पार पडले. नवरा-नवरीसाठी स्टेजवर शाही सिंहासन ठेवले होते. या हायप्रोफाईल लग्नात नवरी लक्ष्मीच्या वेशभूषेत होती तर नव-याने विष्णूचे रूप धारण केले होते. मागील काही दिवसात दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रूथ प्रभू यांचे लग्न चर्चेत होते. त्याचवेळी इंटरनेटवर साऊथच्या या अनोख्या लग्नाने लोकांचे लक्ष वेधून घेतले.