ग्लिटर या भारतातील लोकप्रिय विवाहसोहळा, लाईफस्टाईल आणि उत्सवपूर्व प्रदर्शनाची संकल्पना एबीईसी एक्झिबिशन्स अँड कॉन्फरन्सेस प्रा. लि. यांनी तयार केली.
मुंबई- ग्लिटर या भारतातील लोकप्रिय विवाहसोहळा, लाईफस्टाईल आणि उत्सवपूर्व प्रदर्शनाची संकल्पना एबीईसी एक्झिबिशन्स अँड कॉन्फरन्सेस प्रा. लि. यांनी तयार केली. कलाकुसर केलेली व फॅशन ज्वेलरी आणि वेंडिंग ब्रँडस यांचे प्रदर्शन हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिअटमध्ये ६,७ व ८ ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे.
एबीईसी एक्झिबिशन्स अँड कॉन्फरन्सेस प्रा. लि.च्या लाईफस्टाईल इव्हेंट संचालक बलबीर गांधी म्हणतात, लाईफस्टाईल आणि फॅशन क्षेत्रातील उद्योन्मुख इनोव्हेटर्ससाठी हे प्रदर्शन म्हणजे चोखंदळ ग्राहकांची बाजारपेठ असणार आहे. या प्रदर्शनात, यापूर्वी न पाहिलेली कलेक्शन्स व वैविध्य, नव्या उत्पादनांचे सादरीकरण आणि विविध उत्साहवर्धक ऑफर्स पाहून अभ्यागतांचे डोळे निश्चितच दिपून जाणार आहेत. सर्व फॅशनप्रेमींसाठी ग्लिटर हे वन-स्टॉप-शॉप असणार आहे.