पूर्वेकडील आचोळेरोड येथे एच.डी.एफ.सी. बँकेच्या समोरील गटारावरील झाकण तुटल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
नालासोपारा- पूर्वेकडील आचोळेरोड येथे एच.डी.एफ.सी. बँकेच्या समोरील गटारावरील झाकण तुटल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वसई-विरार महापालिका हद्दीतील अनेक गटारांवरील झाकणे तुटली आहेत. त्यामुळे डॉ. दीपक अमरापूर यांच्यासारखा एखादा बळी महापालिकेला पाहिजे, असा सवाल केला जात आहे.
आचोळेरोड येथे नागरिकांची सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. रस्त्यात वाहनचालक आपली वाहने कशीही पार्क करतात. त्यामुळे रस्त्याच्या कडेने चालणे नागरिकांना मुश्कील झाले आहे. एच.डी.एफ.सी. बँकेच्या समोर गटारावरील झाकण तुटल्यामुळे शाळेतील मुलांना, पादच्या-यांना तसेच बँकेत येणा-या जाणा-यांना या तुटलेल्या गटाराच्या झाकणाच्या बाजूने वाट काढावी लागत आहे. पण ही वाट काढत असताना जर पाय घसरून एखादी व्यक्ती या गटारात पडल्यावर, याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. पालिकेने उघडी असलेल्या गटाराची झाकणे त्वरित बसवण्याची मागणी नागरिक करत आहेत.
[EPSB]
नेरळ ग्रामपंचायतच्या गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
नेरळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे घरगुती गणेश सजावट आणि उत्कृष्ट गणेश मूर्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांच्या सजावटीचे परीक्षण करून निकाल जाहीर केले
[/EPSB]