पतीने पत्नीला जुगारात हरवल्यानंतर ज्यांनी तिला जिंकल त्या दोघांनी तिच्यावर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमधील इंदुरमध्ये घडली.
मध्यप्रदेश- पतीने पत्नीला जुगारात हरवल्यानंतर ज्यांनी तिला जिंकल त्या दोघांनी तिच्यावर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमधील इंदुरमध्ये घडली.
इंदुरमध्ये सर्व पैसे हरल्यानंतर पत्नीलाच जुगारात लावले आणि तो हारला. परिणामी या डाबात जिंकणा-या दोनजणांनी या पिडीत महिलेवर सामुहीक बलात्कार केला, असा आरोप या महिलेने केला आहे. तेव्हापासून ती आपल्या पतीपासून वेगळी राहते. पण जुगारात जिंकणारे दोघेजण तिला त्रास देत आहेत, अशी तिची तक्रार आहे.
नौशाद आणि घनश्याम असे या दोघांची नावे आहेत. या आरोपांची चौकशी करण्यासाठी आम्ही संबंधित पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावले. अद्याप आरोपांची सत्यता पडताळून पाहिलेली नाही, त्यामुळे एफआयआर दाखल केलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.