‘ग … सहा जणी’ या हटके मालिकेची निर्मिती पुरुषोत्तम बेर्डे करत असून, एकाच मालिकेत सहा नायिका असा नवा प्रवाह ते घेऊन येत आहेत.
मुंबई- गेली चार दशके मराठी सिनेनाट्य क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवलेले पुरुषोत्तम बेर्डे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाहच्या ‘ग … सहा जणी’ या हटके मालिकेची निर्मिती पुरुषोत्तम बेर्डे करत असून, एकाच मालिकेत सहा नायिका असा नवा प्रवाह ते घेऊन येत आहेत. १० ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होत आहे.
एका बँकेत काम करणा-या सहाजणींची ही गोष्ट आहे. या सहा जणी प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करतील यात काही शंका नाही. शर्वणी पिल्लई, नियती राजवाडे, नम्रता आवटे, पौर्णिमा अहिरे, सुरभी भावे, मौसमी तोडवळकर अशी एकापेक्षा एक सहाजणींची दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.
नुकताच या मालिकेचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आणि त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.