एफटीआयआयचे नूतन अध्यक्ष अनुपम खेर यांनी दुपारी कॅम्पसमध्ये अचानक ‘एन्ट्री’ घेतली. त्यांची ही एन्ट्री विद्यार्थी आणि कर्मचा-यांसाठी आश्चर्यकारक होती. मात्र, अनुपम खेर यांच्या वागणुकीने सर्वांसाठीच हा सुखद धक्का ठरला.
पुणे- एफटीआयआयचे नूतन अध्यक्ष अनुपम खेर यांनी दुपारी कॅम्पसमध्ये अचानक ‘एन्ट्री’ घेतली. त्यांची ही एन्ट्री विद्यार्थी आणि कर्मचा-यांसाठी आश्चर्यकारक होती. मात्र, अनुपम खेर यांच्या वागणुकीने सर्वांसाठीच हा सुखद धक्का ठरला. अनुपम खेर यांनी यावेळी विद्यार्थ्यांंशी गप्पा मारल्या, त्यांचा क्लास घेतला आणि त्यांच्याबरोबर मेसमध्ये जेवणही केले. शिवाय त्यांनी कर्मचा-यांचीही आपुलकीने विचारपूस केली. कॅम्पसमध्ये प्रवेश केल्यानंतर संस्थेच्या प्रवेशद्वारापासूनच चालत सुरुवात केली. ते जसे अचानक एफटीआयआयमध्ये आले, तसेच एका वर्गावर अचानक जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांचा क्लासही घेतला. चालतच त्यांनी एफटीआयआयच्या वेगवेगळ्या विभागांना भेट दिली.
या संस्थेत मी विद्यार्थी म्हणून शिकलो आहे. त्यामुळे अध्यक्ष झालो असलो तरी, येथे विद्यार्थी म्हणूनच यायला मला आवडेल. विद्यार्थी शिकायलाच येतात. त्यात त्यांना काही अडचणी असतील तर नक्कीच सोडवायला हव्यात, असे अनुपम खेर यांनी सांगितले. दरम्यान अनुपम खेर यांच्या पहिल्याच भेटीनंतर विद्यार्थी आणि कर्मचा-यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणा-या नवनिर्वाचित अध्यक्षांचे विद्यार्थ्यांंनी स्वागतही केले.
[EPSB]
[/EPSB]