जम्मू काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केला असून भारतीय जवानांनी त्यांना चोख उत्तर दिले.
श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केला असून भारतीय जवानांनी त्यांना चोख उत्तर दिले. ही चकमक गुरूवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झाली.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील लंगेट येथील लष्कराच्या तळावर पहाटेच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सतर्क असलेल्या भारतीय जवानांनी त्यांचा हा डाव हाणून पाडत तीन दहशतवाद्यांना ठार केले.
एकतास सुरू असलेल्या हा चकमकीत कोणत्याही जिवीतहानीचे वृत्त नाही. लष्कराने दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.
भारताने पाकवयाप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून पाकिस्तान नियंत्रण रेषेवरून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लघंन करत आहे. पाकिस्ताने भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य केले आहे.