राजभवनजवळील समुद्रात एक बोट बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.
मुंबई- राजभवनजवळील समुद्रात एक बोट बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ही बोट मच्छीमारांची असून यात तीन मच्छीमार असल्याची माहिती मिळते. सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.
ही घटना समजताच तटरक्षक दलाकडून हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरू करण्यात आला आहे. सकाळपासून या बोटीचा आणि यामध्ये असणा-या मच्छिमारांचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप ही बोट सापडली नाही. तटरक्षक दलाकडून या बोटीचा शोध सुरूच आहे.