डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात अवैध फटाक्यांचा कारखाना तपास पथकाला आढळून आला आहे.
सिरसा- बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बाबा राम रहिमच्या सिरसातील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात सध्या सुरू असलेल्या शोधमोहिमे दरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात अवैध फटाक्यांचा कारखाना तपास पथकाला आढळून आला आहे. या कारखान्याला पोलिसांनी तात्काळ टाळे ठोकले आहे. या कारखान्यातील स्फोटके आणि फटाके ताब्यात घेण्यात आली आहेत.
बलात्कार प्रकरणात जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाची निमलष्करी दल आणि हरयाणा पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. या सर्च ऑपरेशनचा आजचा दुसरा दिवस आहे. शुक्रवारी दिवसभर झालेल्या सर्च ऑपरेशनमध्ये रोख रकमेसह अनेक महागड्या वस्तू या मुख्यालयात सापडल्या. आजच्या दुस-या दिवशीही तपासणी सुरू आहे.
मुख्यालयात स्फोटके आणि फटाक्यांचा अवैध कारखाना आढळून आला असून तेथे अद्यापही काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळते. पोलिसांनी कारखान्याला टाळे ठोकले असून तीन अनुयायांना अटक केली. ५ कोटी खर्च करून हिंसा भडकवण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चमकौर सिंह, कर्मजीत आणि दानसिंह अशी त्यांची नावं आहेत. डेरा पंचकुला शाखेचा प्रमुख असलेला चमकौर सिंह हा मुख्य आरो+पी असल्याचे बोलले जात आहे.
[EPSB]
डेराने मृत्यू प्रमाणपत्राशिवाय १४ मृतदेह केले दान
हरियाणातील सिरसा इथल्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली असून यामध्ये धक्कादायक गोष्टीसमोर येत आहेत.
[/EPSB]
Haryana: Fire crackers factory sealed, explosives & fire-crackers seized from #DeraSachaSauda as search continues in Dera HQ in Sirsa pic.twitter.com/sYd4hwmO4v
— ANI (@ANI) September 9, 2017