दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक फटाके बाजारात दाखल झाले असून या फटाक्यांच्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी शुक्रवारी सेंच्युरी रेयॉनच्या मैदानावर फटाक्याचे नमुने गोळा करून या फटाक्यांची आतषबाजी करत प्रत्येक फटाक्याची तीव्रता ध्वनी मापक यंत्रणेद्वारे मोजण्यात आली.
कल्याण- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक फटाके बाजारात दाखल झाले असून या फटाक्यांच्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी शुक्रवारी सेंच्युरी रेयॉनच्या मैदानावर फटाक्याचे नमुने गोळा करून या फटाक्यांची आतषबाजी करत प्रत्येक फटाक्याची तीव्रता ध्वनी मापक यंत्रणेद्वारे मोजण्यात आली.
या चाचणीत आवाज मोजल्यानंतर मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालण्यात येणार होती. मात्र, या चाचणीत फटाक्यांचा आवाज मर्यादेत १४५ डेसीबलपेक्षा कमी असल्याचा निर्वाळा देत प्रदूषण नियंत्रण मंडळाने बाजारात उपलब्ध फटाक्यांना हिरवा कंदील दाखवला. प्रदूषण मंडळाचे डी. बी. पाटील यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्याची प्रदूषण मंडळाने दोन ध्वनी मापक यंत्राच्या मदतीने चाचणी घेतली.
[EPSB]
[/EPSB]