एखाद्या पार्टीला किंवा कार्यक्रमाला जायचं असेल तर आपली जय्यत तयारी चालू होते, अगदी छोटयाछोटया गोष्टींचा आपण विचार करायला लागतो. मग आपल्या मेकअपपासून ते आपल्या ड्रेसला मॅच होईल असे फुटवेअरही लागतात. आपलं सौंदर्य अजून खुलवायचं असेल तर योग्य ते फुटवेअर आपल्याकडे असायलाच पाहिजे. आजच्या ट्रेडिंगनुसार मुलींना रंगीबेरंगी, वेगवेगळया आकाराचे तसेच छोटे घुंगरू, लोकरीचे गोंडे, रंगीबेरंगी धागे इत्यादींचा वापर करून बनवलेल्या फुटवेअर फार आवडतात. असे वेगवेगळे फुटवेअर खास तुमच्यासाठी.
तुम्ही एखादा पंजाबी पोशाख केल्यानंतर किंवा इंडियन ड्रेस घातल्यावर या फुटवेअरचा वापर करू शकता. यामध्ये ब्राईट रंग जास्त असतात जसे की लाल, पिवळा, हिरवा, निळा. या वजनाला हलक्या असल्यामुळे बाहेर जाताना आपल्यासोबत घेऊ शकतो किंवा घरातही सहजपणे हे फुटवेअर ठेवू शकतो. इंडियन आणि इंडो-वेर्स्टन लुकसाठी हा एक चांगलाच ऑपशन आहे.
मल्टी – कलर वेजेस्
या फुटवेअरच्या नावातच कळून जातं की यामध्ये (मल्टी -कलर) निरनिराळ्या रंगांचा वापर केला जातो. या फुटवेअरमुळे तुम्हाला फन्की लूक करता येऊ शकतो. या फुटवेअरची टाच उंच असूनही रोजच्या वापरासाठी आरामदायक अशी ही फुटवेअर आहे. इंडियन लूक तसेच वेस्टर्न लूकवर या फुटवेअर शोभून दिसतात. या वेजेस्मध्ये लेस, ज्युट, वेलवेट इत्यादींचा वापर करून त्यांना अजून आकर्षित केले जाते.
बेलीज्
कोणत्याही लूकवर या फुटवेअरचा वापर केला जातो. याला फ्लॅट्स असेही म्हणतात. या फुटवेअरमध्ये जास्त करून मॅट रंगांचा वापर केला जातो. ज्यामुळे त्याला एक प्रकारची शाईन मिळते, त्यामुळे आपण पार्टीत किंवा फंक्शनमध्ये खुलून दिसतो. याला टाच नसल्याने पायांना अगदी आरामदायक अशी ही फुटवेअर आहे.