वांद्र्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला आपली फेसबूक मैत्री चांगलीच महागात पडली.
मुंबई- वांद्र्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला आपली फेसबूक मैत्री चांगलीच महागात पडली. पैसै गुंतवल्यावर त्याचा दुप्पट फायदा होणार असल्याचे अमिष दाखवून या ज्येष्ठ नागरिकाला तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
वांद्रे येथे राहणारे ज्येष्ठ नागरिकाचा फेसबूकवर एक अमेरिकन मित्र आहे. त्याने या नागरिकाला अफगानिस्तानमध्ये एका स्किममध्ये पैसे टाकल्यास मोठा फायदा होतो. पैशांची दुप्पट किंमत मिळत असल्याचे त्याने बतावणी करत पैसे गुंतवण्यास भाग पाडले.
या मित्राच्या सांगण्यानुसार या ज्येष्ठ नागरिकाने १.९७ कोटी रूपये या स्कीममध्ये भरले. मात्र आपली फसवणूक झाली आहे हे त्या नागरिकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
सायबर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये ही एक संपूर्ण टोळी असल्याचे समोर आले आहे. या टोळीने मुंबईतील वेगवेगळ्या बँकांमध्ये १०८ बोगस खाती उघडली असल्याचे समोर आले आहे. यासाठी खोट्या पॅन कार्डचा वापर करण्यात आला आहे.
पोलिसांनी या टोळीच्या म्होरक्याला मिरा रोडमधील नयानगरमधून अटक केली आहे. शिवाय पीडित व्यक्तिच्या माहितीवरून पोलिसांनी दिल्लीला जाऊन मंगल बिष्णोई, अमित अग्रवाल, समीर मर्चंट उर्फ करण शर्मा, जितेंद्र राठोड आणि परेश यांना अटक केली. या सर्वामागे नायजेरियन मास्टरमाइंड असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांची सर्व खाती सील केली आहेत.