पिडिंताच्या कुटुंबियाने रहिमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी सीबीआय न्यायालयाकडे केली आहे.
चंदिगड- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पिडिंताच्या कुटुंबियाने रहिमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी सीबीआय न्यायालयाकडे केली आहे.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांच्यावर त्यांच्याच आश्रमातील दोन साध्वींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. बाबा रहिम यांनी १५ वर्षांपूर्वी त्यांच्या आश्रमातील दोन साध्वींवर बलात्कार केल्याचाही आरोप आहे. या दोन्ही प्रकरणात बाबा राम रहिम यांना शुक्रवारी दोषी ठरविण्यात आले.
सोमवारी रोहतक येथे झालेल्या सुनावणीत न्यायालयाने रहिमला १० वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र रहिम हा उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहे. पिडितांच्या कुटुंबियांनी त्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी केली,
संबंधित बातम्या