जम्मू-काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून दोन जवान शहीद झाले आहेत.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत दहशतवाद्यांची बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून दोन जवान शहीद झाले आहेत.
हजिन भागात ही चकमक सुरु होती, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे कर्नल राजेश कालिया यांनी दिली.
हजिन भागातील पारिबल गावात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार बुधवारी पहाटेच्या सुमारास पारिबल गावाला सुरक्षा दलांनी वेढा दिला. यावेळी ही चकमक झाली. यात दोन सैनिक शहीद झाले. तर २ दहशतवादी ठार झाले असून येथील शोध मोहिम अद्यापही सुरु असल्याचे सुरक्षा अधिका-यांनी सांगितले.
One terrorist identified as a local, other a Pak national namely Ali. He was instrumental in terror incidents in Hajin area: SP Vaid,DGP J&K pic.twitter.com/hDLVydGscX
— ANI (@ANI) October 11, 2017
2 IAF’s Garuda Force’s personnel lost their lives during encounter in Bandipora’s Hajin(J&K). 2 LeT terrorists gunned down(Deferred visuals) pic.twitter.com/UKPdYBCK3W
— ANI (@ANI) October 11, 2017
2 LeT terrorists killed & 2 security personnel martyred too. Operation is underway: Shambhu Kumar, CRPF Officer pic.twitter.com/0lAvPxQ7WZ
— ANI (@ANI) October 11, 2017