रक्तपेढय़ांतील दूषित रक्त व रक्तघटकांच्या संक्रमणामुळे रुग्णांना एड्सची (एचआयव्ही) बाधा होण्याचे प्रकार अद्याप थांबले नसून वर्षभरात मुंबईतील १८ जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई- रक्तपेढय़ांतील दूषित रक्त व रक्तघटकांच्या संक्रमणामुळे रुग्णांना एड्सची (एचआयव्ही) बाधा होण्याचे प्रकार अद्याप थांबले नसून वर्षभरात मुंबईतील १८ जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्याच्या रक्ताच्या ‘एलायझा’ या तपासणीत पहिल्या टप्प्यातील एचआयव्हीचे निदान होत नसल्याने यासाठी अत्याधुनिक अशा नॅट तपासणीची आवश्यकता यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
मुंबईतील एड्स नियंत्रण सोसायटीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१४ ते २०१७ या तीन वर्षांत ७८ जणांना रक्त व लाल रक्त पेशी, प्लेटलेट्स, प्लाज्मा या रक्त घटकांच्या संक्रमणातून एचआयव्हीची बाधा झाली आहे. यांपैकी २०१६-१७ या चालू वर्षांत १८ जणांना रक्तसंक्रमणातून एचआयव्हीची लागण झाली आहे. सध्या रक्त तपासणीसाठी एलायझा या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. माग ‘एलायझा’ तपासणीत ‘एचआयव्ही’चे तात्काळ निदान होत नाही. ‘एलायझा’ तपासणीत तीन महिन्यांच्या (विंडो पीरिअड) कालावधीत एचआयव्हीचे निदान होते. त्यामुळे सध्या रक्ततपासणीसाठी वापरल्या जाणा-या ‘एलायझा’ तपासणीपेक्षा अत्याधुनिक तपासणी सुरू करणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर रक्तदान करण्यासाठी आलेल्या दात्याचा वैद्यकीय इतिहास, आजार आदी बाबींची विचारपूस केल्यानंतर रक्त घ्यावे, असा सल्ला ‘थिंक फाऊंडेशन’च्या विनय शेट्टी यांनी दिला. सध्या मुंबईत अनेक खासगी रक्तपेढय़ांमध्ये नॅट तपासणी केली जाते. या तपासणीअंतर्गत एचआयव्हीचे निदान पहिल्या दहा दिवसांत होते. या तपासणीसाठी प्रत्येक युनिट रक्तामागे १२०० रुपयांपयर्ंत खर्च येतो. ही तपासणी खर्चीक असल्याने सरकारी रक्तपेढय़ांमध्ये नॅट तपासणी केली जात नाही, अशी माहिती शेट्टी यांनी दिली.
[EPSB]
[/EPSB]