जम्मू-काश्मीरमध्ये जामा मशिदीबाहेर जमावाने दगडाने ठेचून केलेल्या मारहाणीत डीएसपी मोहम्मद अयूब पंडीत यांचा मृत्यू झाला.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये जामा मशिदीबाहेर जमावाने दगडाने ठेचून केलेल्या मारहाणीत डीएसपी मोहम्मद अयूब पंडीत यांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी या हत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
पोलीस उपअधीक्षक अयूब पंडीत हे नौहट्टा परिसरातील मशिदीबाहेर सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात होते. यावेळी ते मशिदीबाहेर जाणा-या – येणा-यांची छायाचित्रे घेत होते. तेव्हा लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. लोक आपल्यावर चाल करुन येत असल्याचे पाहताच अयूब पंडीत यांनी गोळीबार केला. या गोळीबारात तीन लोक जखमी झाले. यावेळी संतप्त जमावाने पंडीत यांना बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.
काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना आणि दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर रमजानच्या महिन्यात कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत, यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रमजानमधील नमाज पठण असल्याने खबरदारी म्हणून ठिकठिकाणच्या मशिदींबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
काश्मीरमध्ये सर्व मुस्लिम बांधव शब-ए-कद्रचा उत्सव साजरा करत आहेत. त्यासाठी सर्व लोक रात्रभर जागून मशिदी आणि दर्ग्यांमध्ये नमाजासाठी येतात. नौहट्टामधील मशिदीबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त होता. पंडित हे मशिदीचा फोटो काढत असल्याचा जमावाचा गैरसमज झाला. काही वेळ गोंधळ उडाला. यावेळी अय्यूब यांनी हवेत गोळीबार केला. त्यात ३ लोक जखमी झाले. त्यानंतर जमावाने पोलीस उपअधीक्षक पंडित यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना बेदम मारहाण केली. तसेच दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव आहे. येथील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे.
Deputy SP Mohammed Ayub Pandith of Security beaten to death by mob in J&K's Nowhatta last night pic.twitter.com/TGIfIQIsFx
— ANI (@ANI_news) June 23, 2017
Another officer sacrificed his life in line of duty DySP Mohammed Ayub Pandith of Security beaten to death by mob at #Nowhatta last night.
— J&K Police (@JmuKmrPolice) June 23, 2017