आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमीतर्फे क्रीडा शिक्षक डॉ. ओमप्रकाश जोशी यांना आयडियल क्रीडा शिक्षक पुरस्काराने राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मुंबई- आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमीतर्फे क्रीडा शिक्षक डॉ. ओमप्रकाश जोशी यांना आयडियल क्रीडा शिक्षक पुरस्काराने राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू महेंद्र तांबे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, निवृत्ती देसाई, सचिन आयरे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘‘विविध खेळ प्रकारातील नवोदित व उदयोन्मुख खेळाडूंचा पुरवठा शाळांच्या माध्यमातून होत असतो. शालेय मुलांचे क्रीडा गुण हेरून त्या खेळात निष्णात बनवण्याचा पाया शालेय स्तरावर होत असतो. त्यामुळे बहुतांश शालेय क्रीडा शिक्षक कामाचा ताण असूनही ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत असतात. त्यांना कौतुकाची थाप दिल्यास ती नक्कीच स्फूर्तीदायक ठरणार असल्यामुळे हा उपक्रम सुरू आहे. म्हणूनच क्रीडा शिक्षक डॉ. ओमप्रकाश जोशी यांचा सन्मान करताना आम्हाला अत्यानंद होत असल्याचे माजी कबड्डीपटू गोविंदराव मोहिते यांनी सांगितले.
शारीरिक शिक्षण विषयामधील डॉक्टरेट मिळवणारे ओमप्रकाश जोशी हे स्वत: उत्तम दर्जाचे ज्युनियर अॅथलीट, कुस्तीपटू व फुटबॉलपटू होते. क्रीडा शिक्षकाचा पेशा स्वीकारताच त्यांनी कबड्डी, खोखो, लंगडी, क्रिकेट, हँडबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बेसबॉल, हॉकी, कॅरम, कुस्ती, योगा, गिर्यारोहण, रस्सीखेच आदी क्रीडा प्रकारांचे नियम व शास्त्रशुद्ध सरावाची पद्धत आत्मसात केली. ओमप्रकाश जोशी हे डॉ. अँटोनियो डा सिल्व्हा हायस्कूलमध्ये क्रीडा संचालक म्हणून अनेक वर्षे कार्यरत आहेत. शाळेच्या माध्यमातून वेळेची चाकोरी न पाहता प्रतिवर्षी शेकडो शालेय मुलांच्या खेळातील सर्वागीण विकासासाठी ते कार्यरत आहेत.
[EPSB]
नागपूरमध्ये कुणाची बाजी? भारत-ऑस्ट्रेलिया पाचवी वनडे आज
[/EPSB]