पुण्यातील हडपसरमध्ये एका टेम्पोने महिला डॉक्टरला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
पुणे- पुण्यातील हडपसरमध्ये एका टेम्पोने महिला डॉक्टरला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मगरपट्टा रोडवर असलेल्या कल्याण ज्वेलर्सजवळ बुधवारी सकाळी घडली.
अनुराधा पटनवार (२३) असे मृत तरुणीचे नाव असून त्या डॉक्टर होत्या. साने गुरुजी रुग्णालयात त्या कर्तव्य बजावत होत्या. मूळच्या नांदेडच्या असलेल्या अनुराधा सध्या भेकराईनगरमध्ये राहत होत्या.
अनुराधा स्कूटीवरुन जात असताना एका टेम्पोची त्यांना जोरदार धडक बसली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला.
हेल्मेट असतानाही अनुराधा यांनी ते न वापरणे, ही बाब त्यांच्या जीवावर बेतल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे.