दिल्लीत ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेच्या हस्तकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली.
नवी दिल्ली- दिल्लीत ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेच्या हस्तकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली. रविवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली असून शोधमोहिम सुरू आहे.
शोमोन हक असे या संशयिताचे नाव आहे. गेल्या चार वर्षांपासून तो ‘अल-कायदा’साठी काम करत होता.
दिल्ली पोलिसाच्या विशेष पथकाला ‘अल-कायदा’चा हस्तक दिल्लीत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली होती. दिल्लीतील विकास मार्ग परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली.
शोकेन हक याची सध्या त्याची कसून चौकशी सुरु असून याप्रकरणात आणखी काही तरुणांना अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शोकेन हक संघटनेसाठी नेमके काय काम करत होता, तो संघटनेत कसा भरती झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.