काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी अटक केलेला मोस्ट वॉंटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर पोलिसांच्या चौकशीमध्ये रोज नवनवे खुलासे करत आहे.
ठाणे- काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी अटक केलेला मोस्ट वॉंटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर पोलिसांच्या चौकशीमध्ये रोज नवनवे खुलासे करत आहे. दाऊद इब्राहिम आणि वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईक यांचे खास संबंध असल्याचा इक्बालने खुलासा केला आहे. वर्ष २०१२ पासून दाऊद इब्राहिम झाकीर नाईकला पैसे पुरवत असल्याचा खळबळजनक खुलासा इकबाल कासकरने केला आहे.
मुंबईतले काही उद्योगपती दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून झाकीर नाईकची मदत करतात आणि त्याला पैशांचा पुरवठा करतात असा खुलासा इक्बालने केला आहे. झाकीर नाईकच्या एनजीओद्वारे हवाला नेटवर्कलाही पैसा पुरवला जातो असे कासकर म्हणाला. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच आहे आणि त्याला पाकिस्तानात सुरक्षाही पुरवली जाते असा खुलासा यापूर्वी कासकरने केला होता.
झाकीर नाईकवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. झाकीर नाईकला विशेष एनआयए न्यायालयाने ह्यफरारी म्हणून जाहीर केले आहे. न्यायालयाने त्याला फरारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) त्याची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली.
[EPSB]
‘ऑपरेशन अर्जुन’मुळे पाकने टेकले गुडखे
[/EPSB]