नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन सिटी येथील हायप्रोफाईल सोसायटीत अज्ञात इसमांनी पार्सलचा बहाणा करून घरात प्रवेश करून दरोडा घालून ३४ लाखांचा दरोडा घालणा-या ६ जणांना तुळींज पोलिसांनी अटक केली आहे.
नालासोपारा- नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन सिटी येथील हायप्रोफाईल सोसायटीत अज्ञात इसमांनी पार्सलचा बहाणा करून घरात प्रवेश करून दरोडा घालून ३४ लाखांचा दरोडा घालणा-या ६ जणांना तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ७ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २२ ऑगस्ट रोजी एव्हरशाइन स्काय हाईट हायप्रोफाईल सोसायटीत रूम ४०३ मध्ये राहणारे कमल अरोरा यांच्या घरी अरोरा यांच्या घरात त्यांची मोलकरीण डॉलीदेवी चंद्रबन्सी ३५ व तिचा मुलगा आदित्य १४ वर्षे हे घरात असताना कुरियर बॉय असल्याचा बहाणा करून चार इसम अरोरा यांचे कुरियर आहे असे सांगून घरात घुसले व त्या दोघांना बंदुकीचा धाक दाखवून बेडरूममध्ये घेऊन जाऊन त्यांचे हात-पाय ओढणीने बांधून घरातील १३ लाख रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले होते.
या प्रकरणाचा तपास करत असताना पालघर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, अप्पर पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन व उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता तोटेवाड, तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राकेश साखरकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिंदे, भास्कर कोठारी, लक्ष्मण तलवारे, किरण म्हात्रे, शेखर पवार, योगेश अहिरे, सुनील पाटील, मनोज सकपाळ, संदीप शेरमाळे, संदीप शेजवळ, संदेश घेगडमल या पथकाने कुरियर म्हणून घेऊन आलेल्या लॉरियल पॅरिस या सौंदर्यप्रसाधनाच्या बॉक्समध्ये असलेल्या कागदाच्या तुकडय़ावर असलेल्या बारकोड नंबरवरून सदर कंपनीचे हेड ऑफिस लोअर परेल मुंबई येथे जावून तेथून सौंदर्यप्रसाधनाचे कंपनीचे डीलर व सब डीलर यांचा शोध घेऊन वसई पूर्व येथील सौंदर्यप्रसाधनांची नावे शोधून काढून ब्रॉडवे थेटरजवळील दुकानात आरोपी यांनी बॉक्स पॅकिंग करत असताना मिळालेले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सागर सांडवे २६, योगेश शेडगे २८, विजय आदमणे ३२, पुलकीत ऊर्फ पुल्ली ठाकूर २०, देवेंद्र ऊर्फ कन्नू सांडवे १९, अरुण सुगावे २४ यांना दत्तात्रय पाटील चाळ केवनी दिवे रोड कोपर येथून अटक करण्यात आली. यांच्याकडे चौकशी केली असता यांच्यात मुख्य आरोपी विजय प्रकाश आदमणे हा मुंबईतील बांधकाम व्यावसायिक असून तो घरमालक कमलकिशोर अरोरा यांच्या व्यावसायिक मित्र असून त्याने त्याच्याकडील पैशाची सर्व माहिती काढून आपल्या मित्रांची टोळी बनवून त्यांना अरोरा यांच्या घराची माहिती देऊन दरोडा घातला. यापूर्वी त्यांनी दोन तीन वेळा दरोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यापूर्वी त्यांनी सीसीटीव्ही केबल कापल्या. जेणेकरून सुगावा लागू नये. मात्र तुळींज पोलिसांनी त्यांचा अचूक माग घेऊन गजाआड केले. त्यांच्याकडून १७ लाख ७५ हजार २९० रुपये किमतीचे ७१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने १४ लाख ५ हजार रक्कम, स्कॉर्पियो गाडी तसेच चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
[EPSB]
[/EPSB]