एका दलित महिलेने केवळ काम करण्यास नकार दिला म्हणून चक्क त्या महिलेने नाक कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भोपाळ- एका दलित महिलेने केवळ काम करण्यास नकार दिला म्हणून चक्क त्या महिलेने नाक कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील रेंवझा गावात ही संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे सर्वत्र तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत.
जानकी धानक असे या पिडीत महिलेचे नाव आहे तर नरेंद्र सिंह (३२) आणि त्याचे वडिल साहेब सिंह यांनी या महिलेचे नाक कापून तिच्या पतीला अमानुष मारहाण केली.
साहेब सिंह यांनी जानकी आणि तिचा पती राघवेंद्र धानक यांना आपल्या घरी येऊन काम करण्यास सांगितले. मात्र राघवेंद्र यांनी काम करण्यास नकार दिल्याने ते दोघे चिडले. त्यांनी जानकी, राघवेंद्रला शिविगाळ केली. त्यांना मारहाण केली.
जखमी असवस्थेत असलेल्या पतीला जानकी रुग्णालयात जात असताना त्या दोघांनी रस्त्यात तिचे नाक कापले, अशी माहिती सुरखी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आर.एस.बागरी यांनी सांगितले.
पीडित महिलेने मध्य प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष लता वानखेडे यांच्यासमोर हे प्रकरण मांडत आरोपींना शिक्षा करण्याची मागणी केली. त्यावेळी हा धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला. महिला आयोगाच्या खंडपीठासमोर जानकीने तिला झालेली मारहाण तसेच नाक कापल्याची ही घटना मांडली. या प्रकरणी दलित आणि आर्थिक स्वरुपात कमकुवत असलेल्या कुटुंबाच्या तक्रारीची महिला आयोगाच्या अध्यक्षाने गांर्भीयाने दखल घेतली आहे.
Woman's nose cut in Madhya Pradesh's Sagar allegedly after she alongwith her husband refused to work as bonded labourers pic.twitter.com/3GtYF7Mfjr
— ANI (@ANI)