मीरा रोड येथील एका जमीन मालकाकडून दहा लाख रुपयांची लाच घेताना ठाण्याचे तहसीलदार आणि त्यांच्या एका साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
भाईंदर- मीरा रोड येथील एका जमीन मालकाकडून दहा लाख रुपयांची लाच घेताना ठाण्याचे तहसीलदार आणि त्यांच्या एका साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील काशी गाव येथील सव्र्हे क्र. ५६, ५९ हिस्सा क्र. ३, ४, ६ या भूखंडाचा मालक असलेल्या तक्रारदाराने सदर भूखंड एन. ए. (अकृषिक) दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता.
हा दाखला मिळण्यासाठो तहसीलदार किसन भदाणे यांनी राम उबाळे यांच्यामार्फत जमीन मालकाकडे दहा लाख रुपयांची मागणी केली होती. या मालकाने याची तक्रार ठाणे लाचलुचपत विरोधी पथकाकडे केली होती. विभागाने सापळा रचून दहा लाख रुपये स्वीकारताना राम उबाळे आणि किसन भदाणे यांना अटक केली आहे.
[EPSB]
वसईत परिवर्तन पॅनेलचे ७ ग्रामपंचायतींवर वर्चस्व
वसई तालुक्यातील सात ग्रामपंचायतींवर परिवर्तन पॅनेलने वर्चस्व दाखविले असून बविआला कोंडीत पकडण्यासाठी कॉँग्रेस, शिवसेना, भाजप व श्रमजीवी संघटनांनी मिळून परिवर्तन पॅनेल स्थापन केले होते.
[/EPSB]