डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठान आयोजित सातव्या ऋचा खुल्या सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत चेकलेस किंग्ज संघाने जेतेपद पटकावले. त्यांचे हे सलग दुसरे जेतेपद आहे.
मुंबई- डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठान आयोजित सातव्या ऋचा खुल्या सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत चेकलेस किंग्ज संघाने जेतेपद पटकावले. त्यांचे हे सलग दुसरे जेतेपद आहे. मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या विद्यमाने मुलुंड विद्यामंदिर शाळेमध्ये (मुलुंड, पश्चिम) झालेल्या स्पर्धेत ४०हून अधिक संघांनी सहभाग दर्शवला. त्यात सर्वाधिक २१ गुण मिळवत चेकलेस किंग्ज संघाने बाजी मारली. कनिंग विनर्सला (१८.५ गुण) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
चेकलेस किंग्ज ज्युनियर (१६ वर्षाखालील) संघाने तिसरा क्रमांक मिळवला. पहिल्या सहा संघात चेस टायटन्स, नथिंग टू लूज आणि कर्जत ओपन संघाचा समावेश आहे. विजेत्या चेकलेस किंग्ज संघाला ऋचा खुला चषक आणि १० हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. गटवार बक्षिसांमध्ये १६ वर्षाखालील गटात स्मार्ट अॅटकिंग चँपियन्स, १२ वर्षाखालील गटात आयसीईके बाहुबली, १० वर्षाखालील गटात स्मार्ट अॅटकिंग चँपियन्स आणि ८ वर्षाखालील गटात आयसीईके ड्रॅगन संघाने बाजी मारली. मुलुंड जिमखान्याचे मानद सचिव प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम झाला.
[EPSB]
मेहेरझाद इराणी आणि लक्ष्मी थांगादुराईची बाजी
भारतीय टेरेन चँपियन्स स्पोर्टिव्ह सीरिज अंतर्गत आठ देशांच्या हौशी सायकल स्पर्धेतील चौथ्या लेगमध्ये (मुंबई) पुरुष गटात मेहेरझाद इराणी आणि महिलांमध्ये लक्ष्मी थांगादुराईने बाजी मारली.
[/EPSB]