शिक्षणासाठी परगावी राहणा-या एका विद्यार्थिनीने समलैंगिक संबंधांसाठी येत असलेल्या दबावानंतर आत्महत्या केल्याची घटना पंजाबच्या कर्नाल येथे घडली आहे.
चंदीगड- शिक्षणासाठी परगावी राहणा-या एका विद्यार्थिनीने समलैंगिक संबंधांसाठी येत असलेल्या दबावानंतर आत्महत्या केल्याची घटना पंजाबच्या कर्नाल येथे घडली आहे. याप्रकरणी तिच्याच हॉस्टेलमध्ये राहणा-या दोन विद्यार्थिनींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघींनी आपल्या बहिणीवर दबाव टाकल्याचा आरोप मृत विद्यार्थिनीच्या मोठय़ा बहिणीने केला आहे.
मूळची पानिपत येथील असलेली मृत विद्यार्थिनी शिक्षणासाठी मोठय़ा बहिणीसोबत कर्नाल येथे राहात होती. कॉलेजच्याच हॉस्टेलमध्ये राहणारी मृत मुलगी ११वीत, तर तिची मोठी बहिण कला शाखेच्या पदवीला शिकत आहे. यापैकी मृत विद्यार्थिनीवर त्यांच्याच हॉस्टेलमध्ये राहणा-या दोन बहिणी समलैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकत होत्या. ही बाब पीडित मुलीने आपल्या मोठय़ा बहिणीला, तसेच हॉस्टेलच्या व्यवस्थापकांनाही सांगितली होती. त्यानंतर तिला तिच्या मोठय़ा बहिणीच्या खोलीत शिफ्ट करण्यात आले होते. मात्र तरीही हे प्रकार सुरूच होते.
शुक्रवारी पीडित मुलीची मोठी बहिण कॉलेज संपवून खोलीवर आली असता तिची लहान बहिण दरवाजा उघडत नव्हती. त्यामुळे तिने हॉस्टेलच्या व्यवस्थापकांना पाचारण केले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना या मुलीचा पंख्याला लटकलेला मृतदेह सापडला.
यानंतर मृत मुलीच्या मोठय़ा बहिणीने पोलिसांत आपल्या लहान बहिणीला त्रास देणा-या दोन मुलींची तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी या दोघींविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुनहा दाखल केला आहे. याप्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली असून घरापासून देर राहून शिक्षण घेणा-या मुलींच्या आई-वडिलांची चिंता वाढली आहे.