पश्चिम आणि मध्य रेल्वे दिवाळीनिमित्त प्रवाशांना एक खास गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. पश्चिम रेल्वेवर येत्या १ ऑक्टोबरपासून ३२ नव्या रेल्वे धावणार आहेत.
मुंबई- पश्चिम आणि मध्य रेल्वे दिवाळीनिमित्त प्रवाशांना एक खास गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. पश्चिम रेल्वेवर येत्या १ ऑक्टोबरपासून ३२ नव्या रेल्वे धावणार आहेत. मध्य रेल्वेवरही पुढील महिन्यापासून ४० नव्या फे-या वाढवण्याची योजना आहे. पश्चिम रेल्वेवरच्या नव्या गाडय़ांची सेवा अंधेरी ते विरार स्थानकादरम्यान असणार आहे.
या ३२ पैकी ९ गाडय़ा पाचव्या लाइनवर (या नव्या ट्रॅकला सबर्बन ट्रॅक अव्हॉइडिंग – रुळ असे म्हणतात) धावणार आहेत. यासोबतच काही १२ डब्यांच्या गाडय़ा १५ डब्यांच्या करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भास्कर यांनी दिली. तूर्त १५ डब्यांच्या ४२ गाडय़ा आहेत. १ ऑक्टोबरबासून १५ डब्यांच्या गाडय़ांची संख्या ५४ होणार आहे.
[EPSB]
दुर्गाडी किल्ल्यावरील जत्रेत भीषण अपघात
[/EPSB]