कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबईकडे जाणा-या लोकलमध्ये महिला प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून हाणामारी झाली.
कल्याण- कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबईकडे जाणा-या लोकलमध्ये महिला प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून हाणामारी झाली.
कल्याण येथून सीएसएमटीकडे जाणा-या लोकलमध्ये डोंबिवलीमधून बसून डाऊन-अप जाण्यासाठी (डोंबिली-कल्याण-मुंबई असा प्रवास करण्यासाठी) आधीच जागा अडवल्याचा राग आल्याने कल्याण स्थानकातील महिलांनी एका महिलेला मारहाण केली. प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता अरगडे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
दरम्यान, महिलेला झालेल्या या मारहाणी संदर्भात पोलिसांना काहीही माहीत नसल्याने कुठलीही तक्रार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीच्या चारुशीला वेल्हाळ या महिलेला कल्याणच्या महिलांनी मारहाण करत जागा सोडण्यासाठी धक्काबुकी केल्याचे समजते.
[EPSB]