गेल्या काही वर्षात भारतीय सिने क्षेत्राकडे तरुणांचं आकर्षण वाढत आहे आणि माध्यम शिक्षणाला अधिक महत्त्व मिळाल्याने विविध महाविद्यालयांत माध्यम शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.
म्हणूनच मुंबईच्या कांदिवलीस्थित ठाकूर महाविद्यालयाने फिल्म, टेलिव्हिजन अॅण्ड न्यू मीडिया प्रोडक्शन हा नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात मुलांना लेखन, दृकश्राव्य माध्यमातून कथेची मांडणी, संहिता लेखन, पटकथा लेखन, संकलन, प्रोडक्शन, दिग्दर्शन, छायाचित्रण अशा वेगवेगळ्या विषयांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे.
या अभ्यासक्रमात मुलांना सिनेमा कसा तयार करतात व तयार करण्याची पूर्ण प्रक्रिया काय असते याचं प्रशिक्षण दिलं जाईल.
बॅचलर ऑफ आर्ट्स इन फिल्म, टेलिव्हिजन, अॅण्ड न्यू मीडिया प्रोडक्शन असं या अभ्यासक्रमाचं नाव आहे. या तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क : ओंकार पाटकर : ९८३३५९७५९८
(विभाग समन्वयक, ठाकूर महाविद्यालय)