कर्करोगग्रस्त रुग्णांना केमोथेरपी आणि रेडिओथेरपीदरम्यान होणा-या केसगळतीमुळे कर्करोगग्रस्त रुग्णांचा कमी होणारा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना या आजाराचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम बनवण्यासाठी रिचफील आणि नर्गीस दत्त फाऊंडेशनने एकत्र येत ‘माय हेयर फॉर कॅन्सर’ हा सामाजिक हेतूने प्रेरित उपक्रम दाखल केला.
कर्करोगग्रस्त रुग्णांना केमोथेरपी आणि रेडिओथेरपीदरम्यान होणा-या केसगळतीमुळे कर्करोगग्रस्त रुग्णांचा कमी होणारा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना या आजाराचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम बनवण्यासाठी रिचफील आणि नर्गीस दत्त फाऊंडेशनने एकत्र येत ‘माय हेयर फॉर कॅन्सर’ हा सामाजिक हेतूने प्रेरित उपक्रम दाखल केला.
केस जाण्यामुळे कर्करोग झालेल्या रुग्णांची स्व-प्रतिमा, सन्मान आणि आत्मविश्वास यांच्यावर परिणाम होतो. कित्येकदा केसगळती ही कर्करोगापेक्षा जास्त त्रासदायक ठरते. म्हणूनच ‘माय हेयर फॉर कॅन्सर’ उपक्रमाद्वारे रिचफील आणि नर्गीस दत्त फाऊंडेशन लोकांना पुढे येऊन त्यांचे केस कर्करोग झालेल्या रुग्णांसाठी दान करण्याचे आवाहन करत आहे. काळा घोडा महोत्सवातून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
कर्करोगाचे निदान होण्याच्या भीतीशी लढण्याचे प्रतीक म्हणून या महोत्सवात कलात्मक रूपक मांडण्यात आले आहे. या कारणासाठी आपले केस दान करू इच्छिणाऱ्यांसाठी लॅक्मे सलोनतर्फे कमी दरात केस कापण्याची सुविधा दिली जात आहे.
डॉ. अपूर्व शहा, संस्थापक, रिचफील या उपक्रमाचे मार्गदर्शक असून कर्करोगाचा सामना करणा-या हजारो लोकांना त्यांचे केस वाढवण्यासाठी आणि त्याद्वारे आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. या उपक्रमाची घोषणा करताना ते म्हणाले, ‘रिचफीलमध्ये आम्ही कर्करोगावर उपचार घेत असताना स्त्री/पुरुषांसाठी मोफत केश-रचना आणि केस परत वाढवण्यासाठी मदत करणारे हेयर किट्स पुरवतो. म्हणूनच आम्ही नर्गीस दत्त फाऊंडेशनबरोबर एकत्रितपणे कर्करोगाचे वेळेवर निदान होण्यासाठी काम करणार आहोत.
कर्करोगाचे वेळेवर निदान झाल्यास उपचार यशस्वी ठरण्याची जास्त शक्यता असते. केसांच्या माध्यमातून आम्ही कर्करोगाचे लवकर निदान होण्यासाठी जागरूकता निर्माण करणार आहोत.’
कर्करोगावर सातत्याने काम करत असलेल्या नर्गीस दत्त फाऊंडेशनच्या विश्वस्त प्रिया दत्त म्हणाल्या, ‘केस कापल्यानंतर ते वाया घालवू नका, तर त्याची गरज असलेल्या व्यक्तीसाठी दान करा. तुमचे केस कर्करोग रुग्णांसाठी दान करा.’ या प्रश्नाबद्दल अतिशय जिव्हाळा असल्यामुळे प्रिया दत्त यांनी स्वत: डॉ. सोनल शहा, सह- संस्थापक, रिचफील यांच्यासह या उपक्रमासाठी केस दान केले.