अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण वणवा पेटला आहे. यात दीड हजार घरांचा जळून कोळसा झाला असून किमान १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण वणवा पेटला आहे. यात दीड हजार घरांचा जळून कोळसा झाला असून किमान १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग झपाटय़ाने आसपासच्या परिसरांमध्ये पसरत आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर जेरी ब्राऊन यांनी नापा, सोनोमा आणि युबा येथा इमरजेन्सी लागू केली आहे. तसेच २० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. रविवारी रात्री सर्वप्रथम आग लागल्याची माहिती मिळाली. पाहता-पाहता ही आग चक्क रविहासी भागांमध्ये पोहोचली.
प्रशासनाने सध्या लोकांचा जीव वाचवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यासोबतच आग विझवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. फॉरेस्ट अॅन्ड सेक्युरिटी डिपार्टमेंटने लोकांना लवकरात लवकर आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत धोकादायक परिसरांमधून वीस हजार नागरिकांना सुखरूप स्थळी हलवण्यात आले आहे. झपाटय़ाने पसरणारी ही आग आता सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत जाईल, असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, ही आग ताशी ६५ किमीच्या वेगाने पसरत आहे.
[EPSB]
[/EPSB]