इमामी लिमिटेड या एफएमसीजी क्षेत्रातील प्रमुख कंपनीने बोरोप्लस झिरो ऑइल झिरो पिंपल फेस वॉश या मुरुमे ब-या करणा-या उत्पादनाची गेल्या वर्षात मध्य प्रदेश येथे यशस्वी चाचणी घेतल्यानंतर ते राष्ट्रीय पातळीवर उपलब्ध करण्याचे ठरवले आहे.
मुंबई – इमामी लिमिटेड या एफएमसीजी क्षेत्रातील प्रमुख कंपनीने बोरोप्लस झिरो ऑइल झिरो पिंपल फेस वॉश या मुरुमे ब-या करणा-या उत्पादनाची गेल्या वर्षात मध्य प्रदेश येथे यशस्वी चाचणी घेतल्यानंतर ते राष्ट्रीय पातळीवर उपलब्ध करण्याचे ठरवले आहे. बॉलिवुड अभिनेत्री क्रिती सेनॉन या उत्पादनासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नेमण्यात आली आहे.
एफएमसीजी क्षेत्रातील प्रमुख कंपनी, इमामी लि. च्या संचालक प्रीती सुरेखा म्हणाल्या, कडुनिंबाचे गुणधर्म असलेले बहुतेक फेस वॉश अस्तित्वात असलेल्या मुरूमांशी लढतात, पण वारंवार येणा-या मुरुमांची समस्या सोडवत नाहीत. तेलकट त्वचा असलेल्या किशोरवयीन मुलींना मुरुमांची जास्त समस्या जाणवते. म्हणून इमामीमध्ये आम्ही बोरोप्लस झिरो ऑइल आणि झिरो पिंपल फेसवॉश तयार केले आहे, बोरोप्लसच्या उत्पादन श्रेणीमध्ये अँटीसेप्टिक क्रीम, रायझिंग लोशन आणि प्रिकली हीट पावडर यांचा समावेश आहे.