मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या २९ मार्चला सादर होणार आहे. मुंबई महापालिकेचा २०१७-१८ या वर्षाचा अर्थसंकल्प २९ मार्चला स्थायी समिती बैठकीत सादर होईल.
मुंबई- मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या २९ मार्चला सादर होणार आहे. मुंबई महापालिकेचा २०१७-१८ या वर्षाचा अर्थसंकल्प २९ मार्चला स्थायी समिती बैठकीत सादर होईल.
पारदर्शक कारभाराच्या मुद्दय़ावर भाजपाकडून कोंडी झाल्यानंतर कसेबसे सत्तेत आलेल्या शिवसेनेला हा अर्थसंकल्प मांडताना पुन्हा एकदा विरोधकांमुळे दमछाक होण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीत अर्थसंकल्पावर पुढील काही दिवस चर्चा झाल्यानंतर मे महिन्यात पालिका सभागृहात हा अर्थसंकल्प मांडला जाईल. मागील वर्षी मुंबई महापालिकेचा ३७ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.
यंदा त्यात घट होण्याची शक्यता आहे. जाहीरनाम्यातील शिवसेनेच्या अजेंडय़ावरील किती बाबींची तरतूद त्यात केली जाते, याकडे अनेकांचे लक्ष्य लागले आहे. गेल्या वर्षी तब्बल ३७,०५२ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यंदा त्यात १० ते ११ हजार कोटींची कपात करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा २६ ते २८ हजार कोटींदरम्यान राहणार आहे.