गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास बळावलेल्या भाजपाने आपला मित्रपक्ष शिवसेनेला आगामी महापालिका निवडणुकीत शह देण्यासाठी भाजपा ‘वॉररूम’मध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे.
मुंबई- गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास बळावलेल्या भाजपाने आपला मित्रपक्ष शिवसेनेला आगामी महापालिका निवडणुकीत शह देण्यासाठी भाजपा ‘वॉररूम’मध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यात शिवसेना प्रभागात घुसखोरी करून सेनेचे कार्यकर्ते फोडणे आणि भाजपाचे वर्चस्व वाढवण्याचे डावपेच सुरू आहेत.
मंगल प्रभात लोढा यांना या ‘वॉररूम’ची प्रमुख जबाबदारी दिली आहे. तसेच मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता, आमदार आशीष शेलार, अतुल भातखळकर, खासदार गोपाल शेट्टी, किरीट सोमय्या, पूनम महाजन यांनाही या वॉररूममध्ये सहभागी करून महत्त्वाची जबाबदारी दिली.
पालिकेकडून काढल्या जाणारी कामे भाजपाबहुल प्रभागात करणे, युपी-बिहारींची निर्णायक मते आपल्याकडे कशी खेचता येतील, याबाबत डावपेच आखले जात आहेत.