काळा पैसा व भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर काळा पैसा बाहेर काढायला आणखी पावले उचलण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिला.
कोबे- काळा पैसा व भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर काळा पैसा बाहेर काढायला आणखी पावले उचलण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिला. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचा हिशोब घ्यायला आपण मागे-पुढे पाहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
येथे भारतीयांसमोर भाषण करताना मोदी म्हणाले की, आम्ही काळ्या पैशाबाबत स्वातंत्र्यकाळापासूनचा हिशोब तपासू. या कामासाठी आम्ही अनेक जणांची नियुक्ती केली आहे. प्रामाणिक माणसांना कोणताही त्रास होणार नाही.
चार ते सहा तास रांगेत राहून त्रास सहन केला, मात्र राष्ट्रीय हितासाठी त्यांनी हा निर्णय मान्य केला. त्यासाठी मी देशवासीयांना सलाम करतो. ही योजना राबवताना अनेक अडचणी येत आहेत. मात्र, या योजनेत गुप्तता राखणे गरजेचे होते. मात्र, ही योजना राबवल्यानंतर जनतेने मला आशीर्वाद दिले ही बाब महत्त्वाची वाटते, असे मोदी म्हणाले.