खासगी वैद्यकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत २० जण ठार तर ५० जण जखमी झाले आहेत.
भुवनेश्वर- खासगी वैद्यकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत २० जण ठार तर ५० जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी रुग्णालयाच्या प्रशासनाने चार कर्मचा-यांना निलंबित केले. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
येथील सम खासगी रुग्णालयाच्या डायलीसीस विभागाला मंगळवारी सकाळी ७.३० वाजता भीषण आग लागली. या आगीने अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण मजला गिळंकृत केला, अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
जखमी रुग्णांना शहरातील अन्य रुग्णालयात दाखल केले. एएमआरआय रुग्णालयाने आठ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. भाजलेल्या अन्य रुग्णांना कॅपिटल रुग्णालयात दाखल केले.