स्वत:ला बाबा म्हणवून घेणारा मात्र प्रत्यक्षात स्त्रियांचे लैंगिक शोषण करणा-या बाबा राम रहीमचे किस्से सध्या राष्ट्रीय पातळीवर गाजत असतानाच गोव्यातही स्वत:ला गुरुजी श्री श्री रविशंकर असे भारदस्त नाव धारण केलेल्या स्वघोषित बाबाकडून वास्कोतील एका १९ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मडगाव- स्वत:ला बाबा म्हणवून घेणारा मात्र प्रत्यक्षात स्त्रियांचे लैंगिक शोषण करणा-या बाबा राम रहीमचे किस्से सध्या राष्ट्रीय पातळीवर गाजत असतानाच गोव्यातही स्वत:ला गुरुजी श्री श्री रविशंकर असे भारदस्त नाव धारण केलेल्या स्वघोषित बाबाकडून वास्कोतील एका १९ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात वास्को पोलिसांनी या बाबासह त्याचे साथीदार संतोषकुमार व निखिल उर्फ बंटी चव्हाण या तिघांवर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे. सध्या हे तिघेही फरार आहेत.
बाबाचे नाव आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्याशी साधम्र्य दाखविणारे असले तरी हा बाबा वेगळा असून कुंदापूर – कर्नाटक येथे त्याने आपला आश्रम थाटला होता. पीडित मुलगी काहीशा विवंचनेत असल्याने बंटी चव्हाण याने हा बाबा तुझ्या अडचणी दूर करेल असे सांगून या बाबाच्या सान्निध्यात आणले होते. सदर युवतीने वास्को पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार ही बलात्काराची घटना चतुर्थीच्या काळात २३ ऑगस्टच्या दरम्यान घडली होती. निपाणी – कर्नाटक येथील संतोषकुमार याने या युवतीला आजरा येथील तिच्या घरी सोडण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीतून लिफ्ट दिली होती.
दरम्यान तिला काहीतरी औषध मिसळलेले पेय पिण्यास दिल्यानंतर, तिला म्हापसा येथील एका अज्ञात स्थळी असलेल्या घरात नेण्यात आले. तिथे सदर बाबा व बंटी चव्हाण होते. त्या दोघांनीही तिला त्या बाबापाशी सोडून ते मागे परतले. त्यानंतर त्या बाबाने आपल्यावर बलात्कार केला आणि याची वाच्यता केल्यास जिवंत मारण्याची धमकी दिली असे या तक्रारीत म्हटले आहे. सध्या या प्रकरणात वास्कोचे पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ तपास करीत आहेत.
[EPSB]
जीएसटी लागू करण्यात घाई : राहुल गांधी
जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने जी घाई केली, त्याचमुळे देशात बेरोजगारीचे संकट निर्माण झाले, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
[/EPSB]