महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा भगवान गडावर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. ३० सप्टेंबरला होणा-या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना भगवान गडावर भाषण करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
बीड- महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा भगवान गडावर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. ३० सप्टेंबरला होणा-या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना भगवान गडावर भाषण करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
भगवान बाबांना वंजारी समाजात संतांचा दर्जा असल्याने भगवानगड हा वंजारी समाजाचे अढळ श्रद्धास्थान आहे. पण हाच भगवानगड राजकीय वर्चस्ववादाचे केंद्रबिंदू बनला आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर होऊ द्यायला तीव्र विरोध केला असून, त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पंकजा मुंडेंना परवानगी नाकारली आहे.
गेल्या वर्षी भगवान गडाच्या दसरा मेळाव्यावरून पंकजा मुंडे आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. या ऑडिओ क्लिपमध्ये नामदेव शास्त्रींना धमकी दिली होती.
दसरा मेळाव्यानंतर नामदेव शास्त्रींना काय करायचे आपण भविष्यात पाहून घेऊ, असे व्हायरल होणा-या कथित ऑडिओ क्लिपमध्ये पंकजा मुंडे म्हणत असल्याचे ऐकू येत होते. या सर्व पार्श्वभूमीवर या वर्षी वातावरण बदलून पंकजा मुंडेंना गडावर भाषण करण्याची परवानगी मिळेल, असे त्यांच्या चाहत्यांना वाटत होते. मात्र तुर्तास महंत नामेदव शास्त्री यांनी गडावर भाषण करण्यास असलेली बंदी कायम ठेवली आहे.
[EPSB]
लोकसभा आणि विधानसभा दोन वर्षावर येऊन ठेपलेल्या असतानाच राज्यातील आमदार आणि खासदार यांच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.
[/EPSB]