अडी-नडीला रुग्णाला औषध देता यावे, यासाठी डॉक्टरांना त्यांच्या कपाटात औषधे ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.
मुंबई- अडी-नडीला रुग्णाला औषध देता यावे, यासाठी डॉक्टरांना त्यांच्या कपाटात औषधे ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र या अडीनडीच्या व्याख्येचा दुरुपयोग करून सर्रास औषधांचे दुकानच काही डॉक्टरांच्या दवाखान्यात उघडल्याच्या तक्रारी आल्याने औषध नियंत्रकांनी त्याची गंभीर दखल सात महिन्यांपूर्वी घेतली होती. त्यानुसार आता डॉक्टरांच्या कपाटातील औषधांची नियमित तपासणी करण्यात यावी, असे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) औषध निरीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे डॉक्टरांची औषधविक्री आता एफडीएच्या स्कॅनरखाली येणार आहे.
औषधे व प्रसाधन कायद्यातील परिशिष्ट के नुसार अडीनडीच्या गरजांसाठी डॉक्टरांना औषधे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांना औषधविक्रीची परवानगी नाही. औषधविक्री करायची झाल्यास वेगळा परवाना घ्यावा लागतो व फार्मासिस्टच्या उपस्थितीत औषधांचे वितरण करण्याचे बंधन असते. या दोन्ही नियमांची पायमल्ली होत असल्याच्या तक्रारी होत्या. औषधविक्रीचा परवाना नसताना डॉक्टरांकडे लसींचा साठाही केला जात असल्याचे आढळले होते. काही ठिकाणी सलाइनच्या बाटल्या कित्येक पटींनी अधिक प्रमाणात साठवलेल्या आढळून यायच्या.
औषधांच्या साठवणुकीबाबतच्या नियमांना असे डॉक्टर उत्तरदायी नसायचे. या गोष्टींविषयी आलेल्या तक्रारींचे पडसाद केंद्रीय औषध सल्लागार समितीच्या ५० व्या बैठकीत उमटले होते. तेव्हा त्याविषयी एक उपसमिती नेमण्यात आली. क्लिनिक्स, नर्सिग होम तसेच नोंदणीकृत डॉक्टरांकडून परिशिष्ट के चा गैरवापर होतो काय, याची वरचेवर छाननी करण्यात यावी व क्लिनिक किंवा नर्सिग होममध्ये एकापेक्षा अधिक डॉक्टर असल्यास औषधविक्रीचा परवाना घेण्याचे बंधन घालावे, अशा सूचना औषध सल्लागार मंडळाने दिल्या होत्या.
[EPSB]
[/EPSB]