पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही सुरूच असून शनिवारी पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
जम्मू- पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही सुरूच असून शनिवारी पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारात प्रादेशिक सेनेचा जवान आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.
काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानने पुन्हा गोळीबार केला. भारतीय रहिवासी भागात पाकिस्तानने तोफा डागल्या. सीमेजवळील करमरा गावातील प्रादेशिक सेनेचे जवान मोहम्मद शौकत आणि त्यांची पत्नी साफिया बी यांच्या घरावर तोफगोळा येऊन पडल्याने त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रुबीना कौसर (१२), झायदा कौसर (६) या त्यांच्या दोन लहान मुली आणि नाझिया बी या तिघीजणी जखमी झाल्या. त्यांना उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.