पुंछ जिल्ह्यातील भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करून पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लघंन केले. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला.
पुंछ- पुंछ जिल्ह्यातील भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करून पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लघंन केले. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला. शनिवारी सकाळी नियंत्रण रेषेवरून अचानक हा गोळीबार करण्यात आला.
पुंछ जिल्ह्यातील कृष्णागाटी मेनधार सेक्टरमध्ये हा हल्ला शनिवारी सकाळी करण्यात आला. या हल्ल्यामध्ये भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये एक जवान जखमी झाला.
भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लघंन करत आतापर्यंत २५ वेळा भारतीय लष्कराला लक्ष्य करत हल्ला केला आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षकांनी दिली.