मुंबई- महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ या राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी कळंब तालुक्यातील वाठवडा येथील अण्णासाहेब शहाजीराव टेकाळे यांची सलग तिस-यांदा बिनविरोध निवड झाली.
माईर्स एमआयटी या संस्थेत ते विशेष कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
अध्यक्षपदी अरूण रोडे (पुणे), सचिवपदी अरविंद कुळकर्णी (कोल्हापुर) आणि कोषाध्यक्षपदी चंद्रकांत साळवेकर (फलटण) यांची निवड करण्यात आली आहे.
अण्णासाहेब टेकाळे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.