नरोदा पटिया भागात दंगल झाली, तेव्हा माया कोडनानी तिथे नव्हत्या. त्या विधानसभेत उपस्थित होत्या. मी स्वत: त्या दिवशी विधानसभेत त्यांना भेटलो होतो, अशी साक्ष भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज विशेष न्यायालयात दिली.
अहमदाबाद– भागात दंगल झाली, तेव्हा माया कोडनानी तिथे नव्हत्या. त्या विधानसभेत उपस्थित होत्या. मी स्वत: त्या दिवशी विधानसभेत त्यांना भेटलो होतो, अशी साक्ष भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज विशेष न्यायालयात दिली. गोध्रा कांडानंतर गुजरातमधील नऊ भागांत मोठय़ा दंगली उसळल्या होत्या. त्यापैकी अहमदाबाद येथील नरोदा येथे झालेल्या दंगलीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ८२ जणांवर खटले सुरू असून गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांना २८ वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
दंगलीच्या दिवशी मी नरोदामध्ये नव्हते. अमित शहांना हे माहीत आहे. त्यामुळे त्यांना साक्षीदार म्हणून बोलावण्याची विनंती कोडनानी यांनी एसआयटीच्या विशेष न्यायालयाला केली होती. न्यायालयाने ती विनंती मान्य करून शाह यांच्यासह १४ जणांना एप्रिल महिन्यात समन्स बजावले होते. इतर १३ जणांनी मधल्या काळात न्यायालयात हजेरी लावून साक्षी दिल्या. मात्र, शहा हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आजची, शेवटची तारीख दिली होती. त्यानुसार शहा आज न्यायालयात उपस्थित राहिले.
नरोदा इथे दंगल उसळली, तेव्हा कोडनानी विधानसभेत होत्या. तिथे सकाळी साडेआठच्या सुमारास आमची भेट झाली होती. त्यानंतर साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान मी सिव्हील हॉस्पिटलमध्ये होतो. तिथेही कोडनानी मला भेटल्या होत्या, असे शहा यांनी न्यायालयात सांगितले. शहा यांची ही साक्ष कोडनानी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
[EPSB]
सरकारला आव्हान देण्यासाठी ‘मातोश्री’वर बोलाविलेल्या बैठकीत शिवसेना आमदार आणि मंत्र्यांमध्येच जोरदार चकमक उडाली
[/EPSB]