अमेरिकेची नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (एनएसए) इतर देशांतील राजकीय पक्षांची हेरगिरी करीत असून, भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, तसेच पाकिस्तानातील पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षांवर अमेरिका नजर ठेवून असल्याचा दावा विकिलिक्सने केला आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेची नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (एनएसए) इतर देशांतील राजकीय पक्षांची हेरगिरी करीत असून, भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, तसेच पाकिस्तानातील पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षांवर अमेरिका नजर ठेवून असल्याचा दावा विकिलिक्सने केला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील गैरव्यवहार उघड करणा-या विकिलिक्स या संस्थेने म्हटले आहे की, नॅशनल सिक्युरिटी एजन्सीवर अशा प्रकारच्या हेरगिरीची खास जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
एनएसएने पाकिस्तानातील मोबाईल नेटवर्कची यंत्रणादेखील हॅक केली आहे असे सांगत विकिलीक्सने अमेरिकेचे पितळ उघडे पाडले आहे.