हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश भट्ट आणि त्यांची मुलगी आलिया भट्ट यांना जीवे मारण्याची धमकी देणा-याला ताब्यात घेतले आहे.
मुंबई- हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश भट्ट आणि त्यांची मुलगी आलिया भट्ट यांना जीवे मारण्याची धमकी देणा-याला ताब्यात घेतले आहे.
संदीप साहू असे धमकी देणा-या व्यक्तीचे नाव असून उत्तरप्रदेश पोलीस एसटीएफ आणि मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिका-यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. त्याला लवकरात लवकर मुंबईमध्ये आणले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संदीपने महेश भट्ट यांना व्हॉट्सअँप कॉलकरून ५० लाखांची मागणी केली होती. उत्तरप्रदेशमधील एका बँक अकांऊटचा नंबरही दिला होता. त्यामध्ये पैसे जमा करण्यास सांगितले होते.
पैसे जमा न केल्यास मुलगी आलिया भट्ट आणि पत्नी सोनी भट्टला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. मात्र भट्ट यांनी या फोनकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना मॅसेज आणि व्हॉट्सअँपवरही धमकीचा मॅसेज आला. या मॅसेजची गंभीर दखल घेत भट्ट कुंटुबियांनी जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली.
महेश भट्ट यांच्यावर अंडरवर्ल्ड आणि माफियांची नजर कायम राहिली आहे. या आधीही भट्ट यांना गुंड रवि पुजारीने पैशांसाठी लक्ष केले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हा हल्ला उधळून लावला होता.