आलिया म्हणते इंडस्ट्री केवळ स्टार किड्सची नसून टॅलेण्टची आहे.
मुंबई- अलिया भट त्या ‘स्टार किड्स’पैकी आहे जिने कमी वयात प्रसिद्धीचे शिखर पार केले आहे. वयाच्या २३ व्या वर्षात तिने बरीच प्रसिद्धी मिळवली आहे.
काही दिवसांपूर्वीच आलियाने ‘स्टार किड्स’बाबत तिचे मत मांडले. आलिया म्हणते इंडस्ट्री केवळ स्टार किड्सची नसून टॅलेण्टची आहे. तुमच्याकडे जर टॅलेण्ट असेल तर तुम्ही कलाकार, डायरेक्टर, कोरिओग्राफर असे कोणीही बनू शकता.
कोणत्याही विभागात तुम्हाला यश मिळू शकते. तुम्ही कितीही मोठय़ा कलाकाराचे अपत्य असाल पण तुमच्याकडे जर टॅलेण्ट नसेल तर तुम्ही आयुष्यात पुढे जाऊच शकणार नाहीत.
तुम्हाला चित्रपट मिळतील; परंतु प्रेक्षक तुम्हाला तेव्हाच स्वीकारेल जेव्हा तुमच्यात काही टॅलेण्ट असेल. टॅलेण्टशिवाय काहीच शक्य नाही.
लवकरच आलियाचा ‘बदरीनाथ की दुल्हनिया’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती वरूण धवनसोबत झळकणार आहे. नुकतेच त्यांनी चित्रपटाचे चित्रीकरण संपवले.